नाशकात गुलाबी थंडीत वाईनचं सेलिब्रेशन

हे कुठे युरोप अमेरिकेत नाही, तर नाशिकमधल्या सुला वायनरीतलं हे सेलिब्रेशन आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वाईनरी एन्जॉय करताहेत. 

Updated: Dec 30, 2015, 11:24 AM IST
नाशकात गुलाबी थंडीत वाईनचं सेलिब्रेशन title=

नाशिक : हे कुठे युरोप अमेरिकेत नाही, तर नाशिकमधल्या सुला वायनरीतलं हे सेलिब्रेशन आहे. लहानांपासून आबालवृद्धांपर्यंत सारेच जण नाशिकच्या या वाईनरी एन्जॉय करताहेत. अनेक जण वाईन टेस्टिंग आणि वाईन मेकिंग विषयी माहिती घेताहेत तर बरेच जण द्राक्ष मळ्यात छायाचित्र काढण्यात मग्न आहेत. अशाप्रकारे जिल्ह्यातल्या किमान पंचवीस वायनरी सज्ज झाल्यात. 

वाईन कॅपीटलमध्ये सध्या साडेचार ते आठ अंशांपर्यंत पारा घसरलाय. त्यामुळे या गुलाबी थंडीत पर्यटकही वाईनचा आस्वाद अनुभवत आहेत. दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागानंही वाईनरीतली पार्टी पहाटे पाच वाजेपर्यंत खुली ठेवायला मंजुरी दिलीय. त्यामुळे शौकिनांच्या उत्साहात आणखीनच भर पडलीय. 

वाईनरींना भेट देण्यासाठी वर्षभरात किमान दोन लाख पर्यटक नाशिक जिल्ह्यात येतात. केंद्र सरकारच्या नव्यानं होउ घातलेल्या पर्यटन विकासात, त्यामुळे नाशिकनगरी नवीन वर्षात देशातलं सुप्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून विकसित व्हायला भरपूर वाव आहे.