झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी आणखी एकाला अटक

दिघ्यातल्या झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाणप्रकरणी आणखी एकाला आज अटक करण्यात आली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली.  झी 24 तासाच्या प्रतिनिधींची जबानी घेण्यास पोलिसांचा वेळकाढूपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर माध्यम जगतात हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 1, 2017, 11:35 PM IST
झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण प्रकरणी आणखी एकाला अटक title=

नवी मुंबई : दिघ्यातल्या झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाणप्रकरणी आणखी एकाला आज अटक करण्यात आली आहे. याआधी दोघांना अटक करण्यात आली.  झी 24 तासाच्या प्रतिनिधींची जबानी घेण्यास पोलिसांचा वेळकाढूपणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. तर माध्यम जगतात हल्ल्याचा तीव्र निषेध व्यक्त होत आहे.

दिघ्यात 'झी 24 तास'च्या प्रतिनिधींना मारहाण करण्यात आली. याप्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. तर इतर आरोपींचा शोध सुरु आहे. मात्र पोलीस हे प्रकरण हवं तितकं गांभीर्यानं घेत नसल्याचं स्पष्ट आहे. मारहाण होऊन दोन दिवस उलटले आहेत. तरी रबाळे पोलीस ठाण्यातून झी 24 तासच्या प्रतिनिधी स्वाती  नाईक यांची अधिकृत जबानी घेण्यात आलेली नाही. 

तपासासाठी दोन पथकं नेमण्यात आली आहेत. या घटनेत मनिष भागणे आणि अल्लाउद्दीन अन्सारी दोघांना याआधी अटक करण्यात आली आहे. तर नारायण घुगे या तिसऱ्या आरोपीला आज रात्री अटक करण्यात आली. 

दंगल माजवणे, मारहाण आणि विनयभंगाचे गुन्हे दाखल कऱण्यात आले आहे. पण सा-या राज्यातून या प्रकरणाचा तीव्र निषेध होतोय. पण नवी मुंबईचे पोलिस आयुक्त हेमंत नगराळे मात्र त्यांच्या हद्दीत घडलेल्या हा माराहणीबद्दल काहीही बोलत नाहीत. 

दिघ्याच्या अतिक्रमणविरोधी कारवाई दरम्यान पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतली. त्यामुळेच गुंडाचं धाडस वाढलं आणि त्यांनी झी मीडियाच्या प्रतिनिधींना मारहाण करण्याची हिमंत केली. बंदोबस्तासाठी असणारे पोलीस, त्यांचे अधिकारी यांच्यावर नगराळे साहेब काही कारवाई करणार का? की त्यांच्या शहरात बोकाळलेल्या गुंडगिरीची थेरं निमूटपणे सहन करणार असा प्रश्न संतप्त नवी मुंबईकर विचारत आहेत.

याआधी आयुक्त तुकराम मुढेंना सुरक्षा देतानाही अशीच चालढकल झाल्याची कुजबुज गेल्या अनेक दिवसांपासून शहरात आहे. त्यामुळे जिथे आयुक्तांच्या सुरक्षेबाबत चालढकल होते. तिथे सामान्य नागरिक किती सुरक्षित मानायचे असाही सवाल उपस्थित होत आहे.