मुंबईत सायनच्या आगीत एक ठार

मुंबईच्या नागपाडा इथल्या एका गोडाऊनला मोठी आग लागलीय. बेलाली रोडवरच्या राज ऑईल मिलच्या मागे हे गोडाऊन आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात.

Updated: Feb 2, 2012, 11:07 PM IST

www.24taas.com, मुंबई

मुंबईच्या नागपाडा इथल्या एका गोडाऊनला मोठी आग लागलीय. बेलाली रोडवरच्या राज ऑईल मिलच्या मागे हे गोडाऊन आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्यात. दुसरीकडे सायन स्टेशनसमोरच्या झोपडपट्टीला आग लागलीय. त्यामध्ये एकाचा मृत्यू झालाय. तर 2 जण जखमी झालेत.

 

नागपाड्याच्या हुसेनी बाजार या परिसरात ही आग लागली आहे. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, घटनेचे अद्याप कारण कळू शकले नसल्याचे घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशामक दलाच्या जवानांनी सांगितले. अत्यंत दाटीवाटीचा परिसर असल्याने या ठिकाणी मदत आणि बचावकार्य करण्यात अडचणी येत आहेत.

 

अधिक माहितीसाठी खालील व्हिडिओ पाहा

[jwplayer mediaid="40568"]