मुंबईतील 3 बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून अटक

आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील तीन तरूणांपैकी एका तरूणाला पुण्यात एटीएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथून 3 तरुण बेपत्ता झाले होते.

Updated: Dec 22, 2015, 11:58 PM IST
मुंबईतील 3 बेपत्ता तरुणांपैकी एकाला पुण्यातून अटक title=

मुंबई : आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय असलेल्या मुंबईतील तीन तरूणांपैकी एका तरूणाला पुण्यात एटीएस अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलंय. काही दिवसांपूर्वी मुंबईतील मालवणी येथून 3 तरुण बेपत्ता झाले होते.

आयसिसमध्ये सहभागी झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला होता. अयाज सुलतान, मोहसीन शेख आणि वाजिद शेख हे ३ तरुण बेपत्ता होते. त्यापैकी अयाज सुलतानला पुणे एटीएसने ताब्यात घेतले आहे. पोलीस त्याची चौकशी करतायंत.