मुंबई : बिहार विधानसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचलाय. आता प्रचारात शिवसेना उतरणार आहे. बिहारमध्ये शिवसेना वाढत आहे. त्यामुळे मी शिवसेना उमेदवारांच्या प्रचाराला जाणार आहे, अशी माहिती युवानेते आदित्य ठाकरे यांनी दिली.
अधिक वाचा : मोदींपेक्षा नेहरु, इंदिरा गांधी परदेशात जास्त लोकप्रिय होते : शिवसेना
आदित्य ठाकरे म्हणालेत, बिहारमध्ये शिवसेना वाढत आहे. मी प्रचारासाठी जाणार आहे. देशात जिथे जिथे शिवसेना वाढत आहे. तिथे तिथे आम्ही ताकद देण्याचा प्रयत्न करणार.
दरम्यान, ते गुलाम अली यांच्याबाबत भाष्य केले. पाकिस्तानकडून सिमेवर गोळीबार सुरू असताना पाकिस्तानी कलाकारांना मुंबईत कार्यक्रम करू देणे चुकीचे आहे. सीमेवर टेन्शन असताना मनोरंजनाचे कार्यक्रम होऊ नयेत असं आमचं मत आहे. गुलाम अलींना सुरक्षा देण्यापेक्षा सिमेवरील सुरक्षा वाढवण्याची आणि भारतीयांना सुरक्षा देण्याची गरज आहे.
अधिक वाचा : भाजपला शिवसेनेचे आव्हान; बिहारमध्ये लढवणार १५० जागा
आदित्य ठाकरेंनी जीतो गेम्सचं उद्धाटन केले. यावेळी ते म्हणालेत, जैन समाज आणि शिवसेनेच अतुट नातं आहे. हे नातं कधीही तुटणार नाही. आपल्या नात्यात कुणी आग लावायचा प्रयत्न केला तरीही हे नातं तुटणार नाही. दरम्यान, सामनातून महागाईबद्दल मांडलेली शिवसेनेची भूमिका योग्य आहे, असे ते म्हणालेत.
अधिक वाचा : बिहारच्या निवडणुकीत शिवसेनेचा 'वजीर'!
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.