उत्सव त्याच ठिकाणी साजरा करणार, दहिबावकरांनी भाजपला ठणकावलं

सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं भाजपवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडपाचा विषय तीन दिवसात निकाली काढला होता. 

Updated: Jul 12, 2015, 03:12 PM IST
उत्सव त्याच ठिकाणी साजरा करणार, दहिबावकरांनी भाजपला ठणकावलं title=

मुंबई: सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीनं भाजपवर हल्लाबोल केलाय. बाळासाहेब ठाकरे यांनी गणेशोत्सव मंडपाचा विषय तीन दिवसात निकाली काढला होता. 

तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशींना सांगून तीन दिवसात वटहुकुम काढला होता.. मात्र भाजपच्या राजकारणामुळं कोर्टाची चपराक बसल्याची टीका समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केलाय. 

हा विषय तुमचा नाही, यामध्ये तुम्ही पडू नका असं दहिबावकरांनी भाजपला ठणकावलंय. कोर्टाचा निर्णय विरोधात गेला तरी उत्सव त्याच ठिकाणी साजरा करणार अशी भूमिकाही त्यांनी घेतलीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.