निश्चित! महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरलीय. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होणार, हे आता निश्चित झालंय. 

Updated: Sep 13, 2016, 02:10 PM IST
निश्चित! महापौर बंगल्यातच होणार बाळासाहेबांचं स्मारक  title=

मुंबई : बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाची जागा अखेर ठरलीय. महापौर बंगल्यात बाळासाहेबांचं स्मारक होणार, हे आता निश्चित झालंय. 

बाळासाहेबांचं स्मारक कुठे बांधण्यात यावं? यासाठी स्वाधीन क्षत्रिय यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमण्यात आली होती. त्या समितीनं यावर शिक्कामोर्तब केलंय. 

या समितीनं मुंबईतल्या अनेक जागांचा अभ्यास केल्यानंतर महापौर बंगल्याची जागा या स्मारकासाठी निश्चित केलीय. या ठिकाणी स्मारक झाल्यानंतर मुंबईच्या महापौरांचं निवासस्थान मुंबईत अन्य ठिकाणी हलवण्यात येणार आहे. या निर्णयाला मनसे आणि काँग्रेसचा मात्र विरोध आहे.