बीड पोटनिवडणुकीत मुंडेविरोधात उमेदवार नाही - पवार

भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jun 21, 2014, 10:54 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
भाजपचे ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बीड मतदारसंघात पोटनिवडणुकीत मुंडे परिवारातील कोणी उमेदवार असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवार देणार नाही असं राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी स्पष्ट केलंय.
भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज मुंबईत एनसीपीए इथे शोकसभेचं आयोजन करण्यात आलंय. या शोकसभेला शरद पवार, भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग, उद्धव ठाकरे उपस्थित होते. त्यावेळी पवारांनी हे स्पष्ट केले.
पवार यांनी मुंडे यांच्या आठवणींना उजाळा दिला. आम्ही दोघं ऊस तोडणी कामगारांचा लढा दिला. मुंडे अनेकांच्या मदतीला धाऊन गेलेत. ते कामगारांसाठी सतत झटत होते, असे पवारांनी सांगितले. तर भाजप अध्यक्ष राजनाथ सिंग यांनी आमच्या चांगल्या सहकाऱ्याला गमावलोय. अशा कार्यक्रमाला मला यावे लागते, हे आमचे दुर्दैव आहे. त्यांची मुलगी पंकजा पालवे यांना संधी दिली जाईल, असे राजनाथ सिंग म्हणाले.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.