मुंबईच्या रस्त्यांवरील धावते 'बेस्ट' एसी पडले बंद!

बेस्टच्या तोट्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या एसी बसेस अखेर सोमवारपासून रस्त्यावर दिसणार नाहीत... असा निर्णयच बेस्ट प्रशासनानं जाहीर केलाय. 

Updated: Apr 13, 2017, 08:35 PM IST
मुंबईच्या रस्त्यांवरील धावते 'बेस्ट' एसी पडले बंद! title=

मुंबई : बेस्टच्या तोट्यातील महत्त्वाचा भाग असलेल्या एसी बसेस अखेर सोमवारपासून रस्त्यावर दिसणार नाहीत... असा निर्णयच बेस्ट प्रशासनानं जाहीर केलाय. 

मुंबईमधील २५ मार्गांवर २६६ एसी बसेस धावत होत्या. या सगळ्या बसेस बंद करण्यात आल्या आहेत. 

उल्लेखनीय म्हणजे, एसी बसचे पासधारक केवळ २१६ असले तरी प्रतिदिन प्रवासी संख्या मात्र १८ ते २० हजारांवर होती.

कर्मचाऱ्यांचे पगार देणंही शक्य नसल्यानं बेस्ट प्रशासनाने कृती आराखडा आखला आहे. ज्यामध्ये एसी बसेस बंद करण्याचा विचार प्रामुख्याने होता. त्यानुसार कपातीतील पहिला निर्णय एसी बसेस बंद करण्याचा घेतला आहे. पुढील काळात खर्च बचतीचे अनेक निर्णय बेस्ट घेणार आहे.