मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या ११४ जागांची यादी फायनल

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं अखेर 114 जागांची यादी फायनल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलंय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 19, 2017, 09:53 PM IST
मुंबई महापालिकेसाठी भाजपच्या ११४ जागांची यादी फायनल  title=

मुंबई : मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं अखेर 114 जागांची यादी फायनल केली आहे. मुख्यमंत्र्यांनी यादीवर शिक्कामोर्तब केलंय. 

यादीला अंतिम स्वरुप देण्यासाठी मुख्यमंत्र्यांशी तासाभरापेक्षा जास्त चर्चा करण्यात आली. आता ही यादी शिवसेनेकडे सोपवण्यात येणार आहे. 

शिवसेनाही आपली यादी आजच भाजपकडे सोपवणं अपेक्षित आहे. त्यामुळं शिवसेनेच्या यादीकडे लक्ष लागलंय. भाजपनं निम्मे जागांवर दावा केल्यामुळं शिवसेनेला ही यादी मान्य होणार का हा खरा प्रश्न आहे.