उत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली

 शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 11, 2017, 02:37 PM IST
उत्तरप्रदेश निकाल, मुख्यमंत्र्यांनी उडवली शिवसेनेची खिल्ली  title=

मुंबई :  शिवसेनेने मुंबई, महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली. आता सर्वाना शिवसेनेचे महत्व आणि ताकद कळाली असेल, या संजय राऊत यांच्या प्रतिक्रियेची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खिल्ली उडवली आहे. 

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या निकालात उत्तरप्रदेश आणि उत्तराखंड राज्यात भाजपने जबरदस्त यश मिळविले आहे. यावर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्रीनी शिवसेनेच्या प्रतिक्रियेची खिल्ली उडवली. 

शिवसेनेने मुंबई आणि महाराष्ट्रात भाजपची घोडदौड रोखली, या शिवसेनेच्या या प्रतिक्रियेबद्दल हसू वाटते, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. 

काय बोलले मुख्यमंत्री...

- नरेंद्र मोदींनी गरीब कल्याणाचा अजेंडा सुरू करून सामान्यांचे सरकार असल्याची जाणीव करून दिली, त्या विश्वासाचा विजय झालाय
- युपीमधील विजय हा देशाचा मूड सांगत आहे
- भाजपने नवा इतिहास रचला आहे
- नोटबंदीनंतर त्याला विरोध केला होता, त्यांना या विजयाने उत्तर दिले आहे
- ज्यांनी त्रास सहन केला, त्यांनी भाजपला विजयी केले
- विरोध करणा-यांना त्यांची जागा दाखवली
- २०१४ नंतर नवे युग सुरू झाले आहे
- मोदींच्या नेतृत्वात देश विकास करेल
- युपीमधील विजयासाठी अमित शहांचे खास अभिनंदन
- शिवसेनेच्या प्रतिक्रियेवर हसू येते
- राम मंदिर १९९२ मध्येच बनले आहे, आता ते भव्य बनवायचं आहे
सीएम
- कर्जमाफीला माझा विरोध नाही, पण ती बँकांना कर्जमाफीसाठी नको तर शेतक-यांसाठी हवी
- राहूल गांधींच्या नेतृत्वाबद्दल प्रश्नचिन्ह कायम आहे, पण काँग्रेसला पर्यायही नाही.