मुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी

 शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 22, 2017, 07:59 AM IST
मुंबईत 10 टक्के पाणीकपात, या भागात कमी पाणी title=

मुंबई :  शहरात 8 एप्रिलप्रर्यंत 10 टक्के पाणीकपात असणार आहे. 25 मार्चपासून ते 8 एप्रिल दरम्यान ही पाणीकपात असेल, असे पालिका प्रशासनाने म्हटले आहे.

गुंदवली-कापूरबावडी-भांडुपच्या जलबोगद्यावर झडपा बसविण्यात येणार असल्याने मुंबईत २५ मार्च ते ८ एप्रिलदरम्यान १० टक्के पाणीकपात केली जाणार आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारीचा उपाय म्हणून पाणी जपून वापरावे, असे आवाहन महापालिकेच्या जल विभागाने केले आहे. 

कापूरबावडी ते भांडुप संकुल येथे महापालिकेच्यावतीने जलबोगद्यावर झडपा बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे कुलाबा, गिरगाव, भायखळा, दादर, माहीम तसेच वांद्रेपासून दहिसरपर्यंत तर कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, कांजूर, भांडुप विभागात दहा टक्के पाणीकपात असणार आहे.