मुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण

मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.

Updated: May 2, 2015, 12:11 PM IST
मुंबईत डॉनच्या मुलाचं लग्न, मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रण title=

मुंबई : मुंबईत लवकरच एका डॉनच्या मुलाचं लग्न होणार आहे. अरूण गवळी त्याच्या मुलाच्या लग्नाची जोरात तयारी करतोय. विशेष म्हणजे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनाही देण्यात आलंय.

मुंबईच्या महालक्ष्मी रेसकोर्सवर अरूण गवळीच्या मुलाचं लग्न होणार आहे. त्यासाठी जोरात तयारी सुरू आहे. शिवसेना नगरसेवकाच्या हत्येची शिक्षा म्हणून गवळी सध्या नागपूरच्या सेंट्रल जेलमध्ये भोगत आहे. त्यातून त्याने १५ दिवसांच्या पॅरोल घेतलाय. लग्नाची कार्डही वाटली गेली आहेत. विशेष म्हणजे या लग्नाला राजकारणी, बॉलिवूड तारे, खेळाडू आणि पोलीस आयुक्तांनाही आमंत्रण आहे. 

मुलाच्या लग्नासाठी डॅडीने पाण्यासारखा पैसा खर्च केलाय. सजावट ते लग्नाची मेजवानी कोणत्याही प्रकारात काँप्रोमाईज करण्यात आलेलं नाही. विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी दुबईत झालेल्या दाऊदच्या मुलीच्या लग्नाशी या लग्नाची तुलना केली जात आहे. दाऊदच्या मुलीच्या लग्नासाठीच्या निमंत्रितांच्या यादीची मोठी चर्चा झाली होती. तशीच चर्चा गवळीच्या मुलाच्या लग्नाची होणार आहे. या निमंत्रितांपैकी कोण कोण उपस्थित राहील याची उत्सुकता आहे.

सध्या गवळी नागपूरच्या कारागृहात शिक्षा भोगतोय. तो आमदारही होता. गवळीची पार्टी अखिल भारतीय सेनेची कमांड त्याची मुलगी गीता गवळी सांभाळते. विशेष म्हणजे मुंबई महापालिकेत शिवसेनेला अखिल भारतीय सेनेचा पाठिंबा आहे. त्यामुळे आता उद्धव ठाकरे गवळीच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण स्विकारतात का हे पाहाणं उत्सुकतेचं आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.