आक्सा बीचवर चार मुले बुडालीत

मौज मजा करण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मुलांवर काळाने घाला घातला. मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडालीत. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आलेय. चक एकाचा मृतदेह सापडला दोघे जण बेपत्ता आहेत.

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मौज मजा करण्यासाठी गेलेल्या मुंबईतील मुलांवर काळाने घाला घातला. मालाडच्या आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेलेली चार मुले बुडालीत. त्यापैकी एकाला वाचविण्यात यश आलेय. तर तिघांचा बुडून मृत्यू झाला.
शाळेला उन्हाळी सुटी असल्याने ही मुले आक्सा बीचवर पोहण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने चौघेही समुद्राच्या पाण्यात ओढले गेलेत. ही १६ ते २० वयोगटातील ही मुले असल्याचे सांगण्यात येत आहे. रंजनपाडा येथील हे सर्व राहणारे आहेत.

पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने चौघेही समुद्राच्या पाण्यात बुडू लागले. त्यामुळे त्यांनी मदतीसाठी आरडाओरडा केला. यावेळी दोन मुलांना वाचविण्यात बीचवरील नागरिकांना यश आले. त्यांना नजीकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, त्यातील एका मुलाचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केलेय. दर्शन दळवी, संदेश मुणगेकर, राकेश नलावडे अशी मुलांची नावे असल्याचे समजते. एका मुलाचे नाव समजू शकले नाही.