मुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार

 मुंबईत कुलाब्याच्या गणेशमूर्तीनगरमध्ये झोपडपट्टीत एका घराच दुमजलीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळी एका घरावर छत कोसळून एक कामगार ठार तर पाच कामगार जखमी झालेत. जखमींना सेंट जॉर्जमध्ये हलवण्यात आलंय.

Updated: Jul 12, 2014, 05:26 PM IST
मुंबईत जोरदार पाऊस, इमारत कोसळून एक ठार

मुंबई : मुंबईत कुलाब्याच्या गणेशमूर्तीनगरमध्ये झोपडपट्टीत एका घराच दुमजलीकरणाचं काम सुरू होतं त्यावेळी एका घरावर छत कोसळून एक कामगार ठार तर पाच कामगार जखमी झालेत. जखमींना सेंट जॉर्जमध्ये हलवण्यात आलंय.

गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजा मुंबईवर चांगलाच प्रसन्न झालाय. काल दिवसभर जोरदार कोसळणा-या पावसानं मुंबईकरांची दाणादाण उडवून दिली होती. पावसाचा जोर संध्याकाळनंतर ओसरला असला तरी रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अनुभव मुंबईकरांना आला.. रात्रभर मुंबई आणि उपनगरात पाऊस सुरु होता.. कधी रिमझिम तर कधी धो-धो पाऊस मुंबईत सुरु होता.. दुसरीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही धो धो पावसाच्या सरी बरसल्या.

गेल्या तीन दिवसांपासून वरुणराजा मुंबईवर चांगलाच प्रसन्न झालाय.. 24 तासांत मुंबईत 95.70 मिमी पाऊस पडला. पूर्व मुंबईत 112.2 मिमी तर पश्चिम मुंबईत 84.18 मिमी पावसाची नोंद झालीय... पावसाचा जोर संध्याकाळनंतर ओसरला असला तरी रात्री पुन्हा एकदा मुसळधार पावसाचा अनुभव मुंबईकरांना आला.. रात्रभर मुंबई आणि उपनगरात पाऊस सुरु होता..दुसरीकडे ठाणे, कल्याण-डोंबिवलीतही धो धो पावसाच्या सरी बरसल्या.. ठाण्यामध्ये गेल्या 24 तासांत 140 मिमी तर कल्याण-डोंबिवलीमध्ये 86 मिमी पावसाची नोंद झालीय. आज दुपारी बारा वाजताच्या सुमारास समुद्रात 4.63 मीटर उंचीच्या लाटा उसळल्या.

मुंबईत गेल्या काही महिन्यांत इमारत कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. मार्चमध्ये विक्रोळी भाहात सात मजली इमारत कोसळून, सात जणांचा मृत्यू झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.