मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार

राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

Updated: May 22, 2015, 07:37 PM IST
मान्सून अंदमानात, महाराष्ट्रात वेळेआधीच येणार title=

मुंबई : राज्यातल्या जनतेसाठी आणि शेतकऱ्यांसाठी एक गुड न्यूज आहे. सध्या मान्सून अंदमानात दाखल झालाय. सध्याची गती आणि परिस्थिती कायम राहिली तर वेळेच्या आधीच महाराष्ट्रात मान्सून सक्रीय होईल, असा अंदाज कुलाबा वेधशाळेनं वर्तवला आहे. 

तसं झाल्यास, गेल्या दोन-तीन वर्षांपासून दुष्काळाचा मार सोसणारा महाराष्ट्रातला शेतकरी आणि पिण्याच्या पाण्यासाठी दाही दिशा वणवण करणारे नागरिक यांच्यासाठी हा पाऊस दिलासा घेऊन येणार आहे.

मान्सून अंदमानमध्ये दाखल झालाय. मान्सून पुढे सक्रीय होण्याबाबत चांगली स्थिती आहे. ही स्थिती कायम राहिली तर, महाराष्ट्रात वेळेआधीच मान्सून दाखल होईल, अशी माहिती कुलाबा वेधशाळेचे शास्त्रज्ञ विश्वभर सिंग यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.