`शिवाजी पार्कात फक्त महाराजाचं स्मारक, दुसरं नको`

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. पार्कावर शिवाजी महाराजांचंच स्मारक असावं.

Updated: Dec 1, 2012, 09:11 PM IST

www.24taas.com, मुंबई
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या स्मारकाच्या वादात आता काँग्रेसनंही उडी घेतली आहे. पार्कावर शिवाजी महाराजांचंच स्मारक असावं. त्यांच्यासोबत अन्य कुणाचंही स्मारक नको, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
अग्नीसंस्कार झाले त्या ठिकाणी उभारलेल्या तात्पुरत्या स्मारकाबाबत, असं बांधकाम करून कोणीही कायदा हाती घेऊ नये, असं माणिकरावांनी म्हटलं आहे.
`शिवाजी महाराजांचा पुतळा असलेले शिवाजी पार्क राज्यातील अकरा कोटी जनतेचे श्रद्धास्थान आहे. महाराजांमुळेच शिवाजी पार्कची जगभरात ओळख आहे. त्यामुळे त्या ठिकाणी दुसरे स्मारक उभारण्यापूर्वी अनेक वेळा विचार करावा लागेल,` असे ठाकरे यांनी प‍त्रकार परिषदेत बोलताना सांगितले.
कायदा हा सगळ्यांसाठी आहे तो सर्वांनीच पाळला पाहिजे. कायदा आणि सुव्यवस्था जो कोणी हातात घेईल, त्यांच्यार कारवाई ही होणारच, असा इशारा देखील ठाकरे यांनी दिला.