एमडी ड्रग्सचा पैसा भारतात दहशतवादी कारवायांसाठी

एमडी ड्रग्सचा पैसा भारतात दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातोय. एटीएसने जप्त केलेल्या १५१ किलो एमडी ड्रग्सच्या तपासा दरम्यान हा खुलासा करण्यात झाला आहे.

Updated: Jul 2, 2015, 01:20 PM IST
एमडी ड्रग्सचा पैसा भारतात दहशतवादी कारवायांसाठी  title=
संग्रहीत

मुंबई : एमडी ड्रग्सचा पैसा भारतात दहशतवादी कारवायांसाठी वापरला जातोय. एटीएसने जप्त केलेल्या १५१ किलो एमडी ड्रग्सच्या तपासा दरम्यान हा खुलासा करण्यात झाला आहे.

एटीएसने अटक केलेल्या आरोपींचे संबंध थेट भारताच्या शत्रू देशांशी आहेत. अनेक आखाती देशांमध्ये या एमडी ड्रग्सची काळी कमाई पाठवली जाते. मुंबई आणि देशात अजूनही एमडी ड्रग्सची तस्करी जोरात सुरु आहे. 

फक्त मुंबई नाही तर राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये ही टोळी ड्रग्सची तस्करी करायची. यासाठी या टोळीने एमडी ड्रग्सला नवीन नाव दिलय. "नमक" या नवीन नावाने ही टोळी मुंबईतील अनेक मोठ्या हॉटेल्समध्ये एमडी ड्रग्स विकते, असे चौकशीत पुढे आलेय. 

एटीएसच्या पथकाने ओशिवारा येथील श्रीजी हॉटेलच्या जवळील इमारतीच्या एका फ्लॅटमध्ये छापा टाकला जिथे एटीएसला ड्रग्स बनवण्याची मशीन, रासायन लिक्विड, आणि पावडर मिळालीये. सूत्रांच्या माहितीनुसार या रॅकेटचा मास्टर माइंड अजूनही फरार आहे. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.