म्हाडाचे घर झाले विक्रमी महागडे!

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत.

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Apr 22, 2013, 08:01 PM IST

www.24taas.com, मुंबई
सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या म्हाडाच्या घरांच्या सोडतीच्या किंमती अखेर ठरल्यायत. यावेळी म्हाडानं घरांच्या किमतीचे सगळे रेकॉर्डस मोडलेत. या घरांच्य किमतीनं सर्वसामान्यांचे डोळे नक्कीच पांढरे होणार आहेत.
मालवणी इथल्या अत्यल्प गटासाठी फक्त 180 चौरस फुटांच्या घराची किंमत 7 लाख 8 हजार आहे. तर पवईजळच्या तुंगा इथल्या उच्च उत्पन्न गटाच्या 476 चौरस फुटाच्या घराची किंमत ही सगळ्यात जास्त आहे. तब्बल 76 लाख 60 हजार इतकी पवईतल्या घरांची किंमत आहे.
तर सगळ्यात मोठं घर गोराई रोडमध्ये उच्च उत्पन्न गटासाठींचं आहे. 740 चौरस फुटांचं हे घर आहे. या घराची किंमत 66 लाख रुपयांच्या घरात आहे. तर मध्यम उत्पन्न गटातील घरांच्या किमतीही या 43 ते 52 लाख रुपयांच्या घरांत आहे.