प्रिन्टिंगचा खर्च कमी करण्यासाठी आमदारांनाही मिळणार 'टॅब'

गोवा आणि हरयाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातल्या आमदारांनाही विधीमंडळ कामकाजासाठी टॅब देण्यात येणार आहेत.

Updated: Oct 25, 2016, 09:30 PM IST
प्रिन्टिंगचा खर्च कमी करण्यासाठी आमदारांनाही मिळणार 'टॅब' title=

मुंबई : गोवा आणि हरयाणापाठोपाठ आता महाराष्ट्रातल्या आमदारांनाही विधीमंडळ कामकाजासाठी टॅब देण्यात येणार आहेत.

येत्या ५ डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी हे टॅब देण्याचा विधिमंडळ सचिवालयाचा प्रयत्न आहे. मात्र, हे टॅब कोणत्या कंपनीचे असतील आणि त्यांची किंमत काय असेल? ते अद्याप गुलदस्त्यातच आहे.

विधिमंडळाच्या विविध प्रकारच्या कामकाजाच्या छपाईवर कोट्यवधी रूपये खर्च होतात. या खर्चात बचत करण्याच्या उद्देशानं हा निर्णय घेण्यात आलाय. 

टॅबसाठी मुंबई आणि नागपूर विधानभवनात वायफाय सुविधाही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.