'निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या'

मुंबईतल्या फेरीवाल्यांवरील कारवाईवरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेत जोरदार जुंपणार असल्याचं दिसतंय. 

Updated: Jul 15, 2015, 02:02 PM IST
'निरुपम, हिंमत असेल तर दादरमध्ये या' title=

मुंबई : मुंबईतल्या फेरीवाल्यांवरील कारवाईवरून मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि मनसेत जोरदार जुंपणार असल्याचं दिसतंय. 

फेरीवाल्यांवर कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांना चोप देऊ असा इशारा निरुपम यांनी काल दिला होता. त्याविरोधात मनसेनं आक्रमक भूमिका घेतलीय.

'निरुपम यांच्यात हिम्मत असेल तर दादरमध्ये येऊन फेरीवाल्यांवरील कारवाई थांबवून दाखवा' असं खुलं आव्हान मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी दिलंय. 

'निरुपमांची दादागिरी खपवून घ्यायला हा काही यूपी, बिहार नाही' असा टोलाही देशपांडेंनी हाणलाय. 

यालाच प्रत्युत्तर देत 'संदीप देशपांडे यांचं आव्हान स्विकारलंय... दादरमध्ये फेरीवाल्यांवर कारवाई झाली तर तिथंही जाईन' असं प्रत्युत्तर संजय निरुपम यांनी दिलंय. 

त्यामुळं, फेरिवाल्यांच्या मुद्यावरून मनसे आणि मुंबई काँग्रेसमध्ये तीव्र संघर्ष निर्माण होण्याचं चित्र आहे. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.