मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल!

मुंबईकरांचा ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखाचा आणि गारेगार होणार आहे. मुंबईत लवकरच एसी ट्रेन धावणार आहे. मुंबईकरांसाठी १२ एसी लोकल्स तयार आहेत. त्यापैकी एक लोकल लवकरच धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं ही घोषणा केलीय. त्याचबरोबर बंबार्डिअरची नवी लोकलही मुंबईत लवकरच धावणार आहे. 

Updated: Jan 12, 2015, 11:45 PM IST
मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल! title=

मुंबई: मुंबईकरांचा ट्रेनचा प्रवास आता आणखी सुखाचा आणि गारेगार होणार आहे. मुंबईत लवकरच एसी ट्रेन धावणार आहे. मुंबईकरांसाठी १२ एसी लोकल्स तयार आहेत. त्यापैकी एक लोकल लवकरच धावणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशननं ही घोषणा केलीय. त्याचबरोबर बंबार्डिअरची नवी लोकलही मुंबईत लवकरच धावणार आहे. 

इतकंच नाही तर पहिली एसी लोकल जवळपास तयार आहे. येत्या दोन महिन्यात पश्चिम रेल्वेवर या लोकलच्या चाचण्या सुरू होतील असं सहाय यांनी सांगितलं.
 
शिवाय विरार- डहाणू मार्गाचं चौपदरीकरण आणि कर्जत - पनवेल मार्गाचं दुपदरीकरण करण्याच्या निर्णयाचीही अंमलबजावणी सुरू होणार आहे. 
 
तिकडे ऐरोली- कळवा उन्नत मार्गावरचंही काम लवकरचं सुरू करण्यात येणार असल्याचं प्रभात सहाय यांनी म्हटलंय.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.