बाळासाहेबांना भेटायचयं, त्यांची माणसं भेटू देणार नाही- राणे

`झी मराठी`वरील `खुपते तिथे गुप्ते` पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अवधूत गुप्तेने उद्योगमंत्री नारायण राणे यांची सपत्नीक मुलाखत घेतली तेव्हा राणेंना नक्की काय खुपतयं? हे विचारलं असता.

Updated: Nov 7, 2012, 04:40 PM IST

www.24taas.com, मुंबई
`झी मराठी`वरील `खुपते तिथे गुप्ते` पुन्हा एकदा नव्याने प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. अवधूत गुप्तेने उद्योगमंत्री नारायण राणे यांची सपत्नीक मुलाखत घेतली तेव्हा राणेंना नक्की काय खुपतयं? हे विचारलं असता... राणेंनी असं काहीसं उत्तर दिलं. शिवसेनेबद्दल आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. त्यांना भेटायला जाण्याचीही तीव्र इच्छा आहे, परंतु त्यांच्या आसपासचे लोक मला भेटू देतील याची शाश्वती वाटत नाही.
गायक-संगीतकार अवधूत गुप्ते यांनी राणेंना नक्की काय काय खुपतं हे अगदी खुमासदार शैलीत विचारलं. शिवसेनाप्रमुखांबद्दल बोलताना राणे म्हणाले की, त्यांच्याबद्दल मला नितांत आदर आहे. मात्र, माझ्यामुळे वडील आणि मुलात भांडणे होऊ लागली तेव्हा मी बाजूला झालो.
माझ्याबाबत काहीही करण्याचा अधिकार बाळासाहेबांना होता, मात्र त्यांच्या मुलाला तो अधिकार मी कधीही देणार नसल्याचे राणे यांनी या वेळी अगदी ठासून सांगितले.

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by clicking this link

Close