राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले, तर स्वबळावर - पटेल

 काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

Updated: Aug 23, 2014, 06:55 PM IST
राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले, तर स्वबळावर - पटेल title=

मुंबई : काँग्रेसकडून जागा वाटपाबाबत लवकर आणि अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर विधानसभा निवडणुका स्वबळावर लढण्याची राष्ट्रवादीची तयारी असल्याचं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलंय. विधानसभा निवडणुकीनंतर राष्ट्रवादीसमोर सर्व पर्याय खुले असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

राष्ट्रवादी काँग्रेसने आगामी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवावी असा पक्षातील अनेक नेत्यांचा आग्रह आहे. त्यामुळे पक्षाने त्या दृष्टीनेही तयारी ठेवली असल्याचं पटेल यांनी मुंबईत काही पत्रकारांशी औपचारिक गप्पा मारताना सांगितले.

जागा वाटपाच्या मुद्यावर आम्ही तडजोड करायला तयार नाही, आम्हाला सन्मानपूर्वक जागा मिळायला हव्यात, अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तसे झाले नाही, तर आमची स्वबळाची तयारी असल्याचं पटेल यांनी स्पष्ट केलंय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.