बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही

पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

Updated: Sep 17, 2015, 10:12 AM IST
बाप्पा पावला, गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला पाणीकपात नाही title=
संग्रहीत

मुंबई : पाऊच चांगला न झाल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांत पाणीसाठा कमी झाल्याने मुंबईत पाणीकपात करण्याचा निर्णय पालिकेने घेतला. मात्र, पालिकेने मुंबईकरांची दोन दिवस पाणीकपातीतून सुटका केली आहे. गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशीला मुंबईत पाणीकपात होणार नाही.

गणपती उत्सवात पाणीकपात करु नका, अशी मागणी मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, आमदार राम कदम यांनी यांनी  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. ही मागणी लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी गणेश चतुर्थी आणि अनंत चतुर्दशी या दोन दिवशी मुंबईत पाणीकपात न करण्याचा निर्णय घेतला.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबई पालिका आयुक्तांना तसे आदेश दिले. दरम्यान, मुंबईकरांनी पाणी काळजी पूर्वक वापरावे, असे आवाहन फडणवीस यांनी केलेय.  सध्या मुंबईत २०  टक्के पाणीकपात लागू आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.