युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार - उद्धव ठाकरे

सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित सामना ऑडिओ बूक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Updated: Jan 23, 2017, 10:22 PM IST
युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार - उद्धव ठाकरे title=

मुंबई : सर्वांचं लक्ष लागून राहिलेल्या युतीसंदर्भात 26 जानेवारीला सविस्तर बोलणार असल्याचं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगितलं आहे. बाळासाहेब ठाकरे जयंती निमित्तानं मुंबईमध्ये आयोजित सामना ऑडिओ बूक अनावरण कार्यक्रमात ते बोलत होते.

सध्या काय नाटकं चालली आहेत ते पाहत असल्याचा टोला उद्धव यांनी यावेळी लगावला. शेपूट घालेन असं वाटत असेल तर तसं अजिबात होणार नाही असं सांगत, युतीत नमती भूमिका घेणार नसल्याचे संकेतच उद्धव यांनी यावेळी दिले. जल्लीकट्टूवरुन तामिळ जनतेनं दाखवलेल्या एकजुटीचा दाखलाही त्यांनी यावेळी दिला. सोबतच पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जाहिरातबाजीवरही त्यांनी निशाणा साधला.