राज ठाकरे नव वर्षाला फाडणार

By Surendra Gangan | Last Updated: Wednesday, October 24, 2012 - 16:02

www.24taas.com, मुंबई
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विरोधकांना इशारा दिला आहे. डिसेंबरपर्यंत आपण फारसं काहीही बोलणार नाही, मात्र नवीन वर्षात सर्वांना फाडायला सुरुवात करणार असल्याचं राज ठाकरे म्हणालेत.
गेल्या काही दिवसांत अनेक घोटाळे बाहेर येऊनही राज ठाकरे शांत कसे, असा सवाल त्यांचे विरोधक करताहेत. या सगळ्या पार्श्वभूमिवर राज ठाकरेंनी नवीन वर्षात पुन्हा एकदा विरोधकांवर हल्लाबोल करणार असल्याचे संकेत दिलेत.
सध्याची राजकीय परिस्थिती, भ्रष्टाचाराच्या आरोपांचे उठलेले वादळ, भाजपचे नितीन गडकरी, कोसळा घोटाळा, जलसिंचन घोट्याळ्यावरून राष्ट्रवादी अजित पवार यांनी दिलेला राजीनामा तसेच सामान्यांच्या जीव्हाळ्याचा विषय सिलिंडर. सिलिंडरची वाढलेली किंमत यावर राज ठाकरे कसा शाब्दीक हल्ला चढवतात की त्याला समर्थन देतात, याकडे लक्ष लागले आहे.

First Published: Wednesday, October 24, 2012 - 15:37
comments powered by Disqus