नारायण राणे यांची राज ठाकरे यांनी केली विचारपूस

काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात गेले आणि राणेंची भेट घेतली.

Updated: Aug 20, 2016, 11:43 PM IST
नारायण राणे यांची राज ठाकरे यांनी केली विचारपूस title=

मुंबई : काँग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या तब्बेतीची विचारपूस करण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे लीलावती रुग्णालयात गेले आणि राणेंची भेट घेतली.

राणे सध्या मुंबईतील लीलावती रुग्णालयात असून आज त्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राज ठाकरे यांनी रूग्णालयात जाऊन भेट घेतली. नारायण राणे यांच्यावर नुकतीच अॅन्जिओप्लास्टीची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. ते सध्या लीलावती रूग्णालयात दाखल आहेत. 

दरम्यान, यापूर्वी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर राज ठाकरे यांचे सांत्वन करण्यासाठी नारायण राणे राज ठाकरेंच्या कृष्णकुंज या निवासस्थानी गेले होते.