सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी

राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

Updated: Sep 17, 2015, 02:30 PM IST
सचिन तेंडुलकर कुटुंबासह लालबाग राजाच्या चरणी title=
छाया - फेसबुक

मुंबई : राज्यातसह देशात बाप्पाचे आगमन मोठ्या उत्सहात होत असताना मुंबईत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि त्याच्या कुटुंबीयांनी लालबागच्या राजाचे दर्शन घेतले.

नेहमी ज्याचा उल्लेख केला जातो तो क्रिकेटचा देव अर्थात सचिन तेंडुलकर याने हात जोडून लालबागच्या राजाच्या चरणी लीन झाला. सचिनने दर्शनाचा फोटो फेसबुकला अपलोड केलाय.

फुल कव्हरेज : मंगलमूर्ती मोरया
 
यावेळी सचिन सोबत, त्याची पत्नी अंजली, मुलं सारा आणि अर्जुन लालबागच्या राजाचे दर्शन घ्यायला आवर्जुन उपस्थित होते. लालबागच्या राजाचे दर्शन घेण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.