मी माफी मागणार नाही- शोभा डे

स्वतंत्र तेलंगणाच्या घोषणनंतर मुंबई आणि महाराष्ट्रही स्वतंत्र होऊ शकतात, अशा अर्थाचं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या विरोधात शिवसैनिकांनी शोभा डेंच्या घरासमोर आज निदर्शन केलं. मात्र आपण माफी मागणार नसल्याचं शोभा डे यांनी म्हटलं आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Aug 1, 2013, 06:27 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
स्वतंत्र तेलंगणाच्या घोषणनंतर मुंबई आणि महाराष्ट्रही स्वतंत्र होऊ शकतात, अशा अर्थाचं ट्विट शोभा डे यांनी केलं होतं. या विरोधात शिवसैनिकांनी शोभा डेंच्या घरासमोर आज निदर्शन केलं. मात्र आपण माफी मागणार नसल्याचं शोभा डे यांनी म्हटलं आहे.
वादग्रस्त विधान केल्याबद्दल शिवसैनिकांनी शोभा डे यांच्या घरासमोर आज निदर्शन केलं. शोभा डें नी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागावी, अशी मागणीही त्यांनी केली. शोभा डे या मुंबईच्या पेज-३ कल्चरचं प्रतिनिधीत्व करतात. त्यांना महाराष्ट्राच्या जनतेची समज नसल्याचं शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं. मात्र आपलं वक्तव्यं उपहासात्मक होतं. त्याचा चुकीचा अर्थ काढला गेला आहे, असं म्हणत शोभा डे यांनी माफी मागण्यास सपशेल नकार दिला आहे.
मुंबई आणि महाराष्ट्र वेगळे होऊ शकतात, या अर्थाचं वादग्रस्त विधान केल्याबद्दल अनेकांनी शोभा डे यांच्यावर हल्लाबोल केला आहे. मुंबई वेगळी करणं, हे घटस्फोट घेण्याइतकं सोपं नसतं, असं म्हणत मनसे प्रमुख राज ठाकरेंनी थेट वैयक्तिक टीका शोभा डें वर केली. तर डे यांचं वक्तव्य दुर्दैवी असल्याचं विधान काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केलं. मुख्यमंत्र्यांनी मात्र मुंबई, विदर्भ आणि महाराष्ट्र एकसंघच राहील अशी घोषणा केली. तसंच आपलं वैयक्तिक मत मांडण्याचा अधिकार प्रत्येकाला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.