शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे

 शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 8, 2017, 06:35 PM IST
शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही - नारायण राणे  title=

मुंबई :  शिवसेना सत्तेतून बाहेर पडणार नाही, कारण एकदा वाघाच्या तोंडाला रक्त लागले तर तो साधे मासं खात नाही... त्यांना पैशाची चटक लागली आहे, त्यामुळे पाच वर्ष सत्तेचे रक्त पिणार असल्याने ते सत्ता सोडत नाही, असा दावा माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी झी २४ तासच्या रणसंग्राम या कार्यक्रमात केला आहे. 

शिवसेनेला सत्तेची गोडी लागली आहे. अनेकांना त्यांनी कामे दिली आहेत. त्यातून कमाई करण्याचे दिवस आहेत. त्यावेळी ते सत्ता सोडणार नाही असे यांनी यावेळी सांगितले. 

राज्यात आणि केंद्रात कोणी विरोध करू नये यासाठी भाजपलाही शिवसेना सत्तेत हवी आहे. त्यामुळे ते सत्तेतून शिवसेनाला बाहेर जाऊ देणार नाही..

उद्धव ठाकरेंकडे धमक नाही. 

सरकारमधून बाहेर पडण्याची धमक ही उद्धव ठाकरेंकडे नाही. साहेब (बाळासाहेब) असते तर ते कधीच बाहेर पडले असते, असा टोलाही नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांना टोला लगावला.