शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी

महानगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय रंग अधिक भरु लागले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पोस्टरबाजी दिसत आहे. हे पोस्टर भाजपविरोधी दिसत आहे. मात्र, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसनेते नारायण राणे यांचेही फोटोही दिसत आहेत.

Updated: Oct 21, 2015, 11:06 AM IST
शिवसेनेच्या रडारावर भाजपसह मनसे आणि काँग्रेस...केली पोस्टरबाजी title=

मुंबई : महानगरपालिका निवडणुकीच्यानिमित्ताने राजकीय रंग अधिक भरु लागले आहेत. दसरा मेळाव्याच्या निमित्ताने राजकीय पोस्टरबाजी दिसत आहे. हे पोस्टर भाजपविरोधी दिसत आहे. मात्र, यावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे, काँग्रेसनेते नारायण राणे यांचेही फोटोही दिसत आहेत.

घाटकोपर पूर्व विधानसभा मतदार संघात ही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. शिवसेना भवनाजवळ हे ठळक पोस्टर दिसून येत आहे. भाजपविरोधा पोस्टरबाजी झालेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना गर्विष्ठ म्हणून हिणविण्यात आलेय. भाजप, काँग्रेस, मनसे नेते पोस्टरवर हजर आहेत. तर मोदी बाळासाहेबांसमोर झुकतानाचा फोटोही आहे.

पोस्टरवर लिहिलेय....विसरले ते दिवस कसे हे, की ढोंग वरकरणी,  झुकल्या होत्या यांच्या गर्विष्ठ माना...साहेबांच्या चरणी....फक्त बाळासाहेब.

 

पाहा हा व्हिडिओ :

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.