वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती

पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5 टक्के जागा मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. 

Updated: Apr 30, 2017, 07:46 PM IST
वैद्यकीय प्रवेशातील मराठी मुलांच्या आरक्षणाला स्थगिती  title=

मुंबई : पदव्युत्तर वैद्यकीय प्रवेशात 67.5 टक्के जागा मराठी मुलांसाठी ठेवण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाला मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. झी 24 तासच्या पाठपुराव्यानंतर राज्य सरकारनं अभिमत विद्यापीठ आणि खासगी मेडिकल कॉलेजमध्ये स्थानिक मुलांसाठी राखीव जागा ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

या निर्णयाविरोधात पंजाब आणि राज्यस्थानमधील काही विद्यार्थ्यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर हायकोर्टातील हॉलिडे कोर्टात सुनावणी झाली. विशेष म्हणजे इतर राज्यांनीही तिथल्या स्थानिक मुलांसाठी कोटा ठेवण्याचा निर्णय यापूर्वीच घेतलाय.