राज्यात उष्माघाताचे दोन बळी

 उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Mar 30, 2017, 07:16 PM IST
राज्यात उष्माघाताचे दोन बळी  title=

मुंबई :  उष्माघातामुळं राज्यात दोन जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी दिलीय. 
 
 राज्य सरकारनं सरकारी रुग्णालयांमध्ये हीट वेव्ह थेरपी सुरू केली असून यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात आल्याचंही त्यांनी नमूद केलं. 
 
 तसंच तापमान बदलामुळं स्वाईन फ्लूचंही प्रमाण वाढल्याचं सावंत यांनी सांगितलं. सकाळी १८ ते १९ डिग्री तापमान असलं. मात्र नंतर जास्त तापमान वाढत असल्याचं निदर्शनास आलंय. 
 
 रविवारी पुण्यात जाऊन आढावा घेतला असून यावर नियंत्रण मिळवण्यात यश आल्याचा दावा आरोग्यमंत्र्यांनी केलाय. 

धुळ्यात महिलेचा मृत्यू 

 
 धुळे जिल्ह्यात उष्माघाताने महिलेचा मृत्यू झाला आहे. शिरपूर तालुक्यातील बाभूळदे येथील माजी सरपंच मालतीबाई निकुंभे उष्माघाताला बळी पडल्यात.  मालतीबाई निकुंभे यांना ताप असल्यामुळे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होतं. 
 
 प्राथमिक उपचारानंतर त्यांना धुळ्यात हलवण्याचा सल्ला देण्यात आला. पण रुग्णालयात नेत असतांना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. धुळे जिल्ह्यातल्या उष्माघाताचा हा पहिल्या बळी ठरलाय.  दरम्यान, आदल्या दिवशी खोकला येत असल्यामुळे मालतीबाई निकुंभे यांना रुग्णालयात आणले होते. 
 
 त्यांच्या शरीरात 106 डिग्रीपर्यंत ताप होता. त्यामुळेच त्यांचा मृत्यू उष्माघाताने झाला असावा, अशी प्राथमीक  माहिती समोर आली आहे. मालतीबाई शेतात फेरफटका मारायला गेल्या असतांना त्यावेळी तापमानाचा पारा हा 40 अंशावर होता.