राज्याचे गृहमंत्री काय करत आहेत?

राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना गृहमंत्री आर.आर.पाटील काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 45 दिवसं उलटलीत तरी मारेकरी मोकाट आहेत.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Oct 3, 2013, 08:01 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
राज्यातल्या कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले असताना गृहमंत्री आर.आर.पाटील काय करत आहेत हा प्रश्न कायम आहे. सामाजिक कार्यकर्ते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला 45 दिवसं उलटलीत तरी मारेकरी मोकाट आहेत.
नाशिकमध्ये मणप्पुरम फायनान्स् कंपनीवर दरोडा पडला तर नागपुरात दरोडेखोरांनी आयसीआयसीआय बॅँकेतल्या अधिका-याची हत्या केली. तर ठाण्यात बेपत्ता झालेल्या तीन वर्षांच्या मुलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्यात आली. तर नागपुरातही दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार करण्यात आलाय.
खून, दरोडे, बलात्कार अशा सर्वच प्रकारच्या गुन्ह्यात वाढ झाली असताना गृहमंत्री आर पाटील कधी कार्यररत होणार हा प्रश्न सर्वांना सतावतोय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.