मृतदेह जेव्हा जिवंत झाला...

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जिवंत व्यक्ती मृत घोषित झाल्याची घटना घडली आहे. नागपुरातल्या हडकेश्वर पोलीस ठाण्याचे कॉन्सटेबल विनोद धरपाळ हे आपल्या पायांच्या शस्त्रक्रियेसाठी नागपुरातल्याच सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर ऑपरेशनही पार पाडण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृतीली सुधारणा नाहूी. त्यामुळे सोमवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं.

Updated: Jan 22, 2014, 03:48 PM IST

www.24taas.com, वृत्तसंस्था , नागपूर
डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे जिवंत व्यक्ती मृत घोषित झाल्याची घटना घडली आहे.
नागपुरातल्या हडकेश्वर पोलीस ठाण्याचे कॉन्सटेबल विनोद धरपाळ हे आपल्या पायांच्या शस्त्रक्रियेसाठी नागपुरातल्याच सनफ्लॉवर हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. त्यांच्यावर ऑपरेशनही पार पाडण्यात आले. त्यानंतर त्यांची प्रकृतीली सुधारणा नाही. त्यामुळे सोमवारी त्यांना डॉक्टरांनी मृत घोषीत केलं.
विनोद धरपाळांच्या मृत्युमुळे धारपळ कुटुंबीयांना दुःख अनावर झाले. शोकाकुल वातावरणात त्यांच्या अंत्ययात्रेची तयारीही करण्यात आली. सारे नातेवाईक धारपळ कुटुंबीयांचे सांत्वन करण्यात मग्न होते. अन् अचानक मृतदेह उठुन बसला. मग एकदम खळबळ माजली. विनोद धरपाळांनी आपण जिवंत असल्याच सांगितल्यावर हा गोंधळ शांत झाला.
डॉक्टरानाच जिवंत आणि मृत व्यक्तीमधील फरक कळेना झाल्याने परिसरात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे धारपळ कुटुंबास मनस्ताप सहन करावा लागला.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.