वेगळ्या विदर्भासाठी थेट जंतरमंतरवर...

वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची आज मागणी करणार आहेत.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Aug 5, 2013, 10:28 AM IST

www.24tass.com , झी मीडिया, नवी दिल्ली
वेगळ्या विदर्भाची मागणी थेट सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी नागपूरमधील सुमारे ५०० ते ७०० आंदोलनकर्ते थेट दिल्लीत दाखल झालेत. जंतरमंतरवर एकत्र येऊन ते वेगळ्या विदर्भाची मागणी करणार आहेत.
वेगळ्या तेलंगणाला हिरवा कंदील मिळण्याची चिन्हं दिसू लागताच इतर राज्यांमध्येही वेगळं होण्याच्या मागण्या चांगल्याच जोर धरू लागल्या आहेत. केंद्रीय गृहमंत्रालयाकडं २०हून अधिक नव्या राज्यांच्या मागणीचे प्रस्ताव आले आहेत. महाराष्ट्रात वेगळ्या विदर्भाची मागणीही जोर धरू लागली आहे.
आजपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय. याच पार्श्वभूमिवर वेगळ्या विदर्भाची मागणी करण्यासाठी आंदोलनकर्त्यांनी दिल्ली गाठलीय. दिल्लीतल्या आंदोलन करून नागपुरात परतल्यावर पुढल्या आंदोलनाची दिशा ठरवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलनकर्त्यांनी दिलीय. दरम्यान, नागपूरहून दिल्लीला रवाना होण्यापूर्वी आंदोलनकर्त्यांनी रेल्वे स्थानकावर वेगळ्या विदर्भासाठी घोषणाबाजीही केली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.