अडवाणींच्या टीकेनंतर गडकरींचे मौन

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.

Updated: Jun 1, 2012, 02:48 PM IST

www.24taas.com, नागपूर

 

भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी ब्लॉगमधून पक्षाध्यक्ष नितीन गडकरी यांच्यावर केलेल्या टीकेला उत्तर देण्याचं गडकरींनी टाळलं. आज सकाळी त्यांना नागपूर विमानतळावर विचारलं असता गडकरींनी बोलण्यास नकार दिला.

 

भाजपवरही देशातली जनता नाराज आहे, असं मत ब्लॉगद्वारे व्यक्त करत ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांना लक्ष्य केलंय. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत समोर आलेल्या मतभेदानंतर, अडवाणींनी ब्लॉगमध्ये भाजपवर जनता नाराज असल्याचं म्हटलंय. यूपीए सरकारबाबत सर्वसामान्य़ जनतेत जरी संताप असला, तरी भाजपवर मात्र ते नाराज आहेत असं त्यांनी लिहिलं आहे.

 

ही आत्मचिंतनाची वेळ असल्याचंही त्यांनी म्हटलंय. उ. प्रदेशात भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर पक्षातून काढून टाकण्यात आलेल्या बाबूसिंग खुशवाह यांना तिकीट दिल्यानं, भाजपचं भ्रष्टाचाराविरोधातल आंदोलन क्षीण झाल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. यानिमित्तानं त्यांनी गडकरींना टार्गेट करण्याची संधी सोडली नाही.

 

जेव्हा भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर युपीए सरकारवर चोहूबाजूंनी टीका होते आहे, त्याचवेळी भाजप किंवा एनडीए या सरकारला पर्याय म्हणून समर्थपणे समोर येत नसल्याची टीकाही होते आहे, आणि ही टीकाही योग्यच असल्याचं त्यांचं म्हणणंय. गडकरींना टार्गेट करताना सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या कामाचं मात्र त्यांनी कौतुक केले आहे.

 

संबंधित बातमी

 

लालकृष्ण अडवाणींचा भाजपवरच निशाणा

भारतीय जनता पक्षामधील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आले आहेत. लालकृष्ण आडवाणी यांनी थेट भाजप अध्यक्ष नितीन गडकरी यांनाच टार्गेट केले आहे. गडकरी यांच्यावर टीका करताना अडवाणी म्हणाले, भाजपवर लोकांचा विश्वास राहिलेला नाही.