छगन भुजबळ दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर

दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Mar 3, 2013, 11:50 PM IST

www.24taas.com, नाशिक
दुष्काळी भागाचा दौरा करण्यासाठी आलेल्या छगन भुजबळांनी अधिका-यांना चांगलंच धारेवर धरलं...यावेळी त्यांनी नागरिकांची भेट घेत त्यांच्या समस्या जाणून घेण्याचाही प्रयत्न केला..
नाशिकचे पालकमंत्री असलेले छगन भुजबळ इगतपुरीतल्या जनता दरबारात दुष्काळासंदर्भात लोकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी आले होते. भुजबळ नाशिक जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यात फिरुन सध्या लोकांच्या समस्या जाणून घेत आहेत. सोबत सरकारी अधिकारी आणि पुतणे खासदार समीर भूजबळही आहेत. तहसीलदार टँकरची मागणी नाही असं सांगतोय. मात्र वस्तुस्थिती ही आहे की लोकांना पाण्यासाठी दारोदार भटकावं लागतंय. आमदारांनी पाणी मिळत नसल्याचा खुलासा करत तहसिलदार आणि पालकमंत्र्यांच्या डोळ्यात अंजन घातलं.
तालुक्यात दोनशे विंधनविहीरींपैकी फक्त दोन विहिरी बंद असल्याचा धक्कादायक खुलासा करत प्रशासनाची डोळेझाक सुरूच आहे. इगतपुरी खरंतर धरणांचा तालुका...पण अनेक गावांमध्ये राजीव गांधी पेयजल तसंच अनेक योजना धूळखात पडल्या आहेत.

सिन्नर आणि नंतर येवल्याचा आढावा घेण्यात आला. चारा डेपो आणि धरणांची स्थिती पाहता एप्रिल-मे मध्ये काळ कठीण होणार आहे हे आता पालकमंत्र्यांच्याही लक्षात आलंय. आता लोकांची तहान भागवली नाही तर काही खरं नाही हे लक्षात घेऊनच भुजबळ लोकांच्या समस्या ऐकण्यासाठी या दौ-यावर निघाले आहेत...