`त्या` बेकायदेशीत गर्भपाताबद्दल डॉ. गोरे अडचणीत

नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.

Aparna Deshpande Aparna Deshpande | Updated: Feb 8, 2014, 09:14 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये अनधिकृतपणे गर्भपातप्रकरणी शासकीय अधिकारी असलेले डॉ. गोरे आता अडचणीत आलेत. उपनगर पोलिसांनी या प्रकरणी फिर्याद दाखल करून घेतलीय. असं असलं तरी अद्याप कारवाई होत नसल्यानं व्हिजिलन्स कमीटीही बुचकळ्यात पडलीय.
दरम्यान व्हीजालंस कमिटीनं डॉ. गोरे हे दोषी असल्याचं म्हटलंय. तर डॉ. गोरे मात्र गर्भपात अधिकृत असल्याचं सांगतायेत.
त्रिंबकजवळच्या तलवाडे शिवारात राहणाऱ्या सोनालीनं आपला अनधिकृतपणे गर्भपात केला गेल्याची तक्रार केली होती. बेशुद्ध करून तिच्या संमतीविनाच तिचा गर्भपात बेकायदेशीरपणे हा गर्भपात करण्यात आला.
अशी घडली घटना
गेल्या वर्षी सोनालीचं लग्न इगतपुरीजवळच्या खबाळ्यातल्या अशोकशी झालं. सोनालीला दिवस गेल्यानंतर माहेरी सासरी सर्वत्र आनंदी आनंद असताना सोनालीच्या पतीनं आणि सासूनं डॉक्टरकडे शारीरिक तपासणी करताना घोटीला एका दवाखान्यात तिची गर्भनिदान चाचणी केली. त्यानंतर ते तिला गर्भपात करवून घेण्याच्या मागे लागले. सोनालीनं जबर विरोध करून हट्ट परतवून लावला. अखेर नाशिकच्या श्रीकृष्ण हॉस्पिटलमध्ये तिला दाखल गर्भाच्या तापसणीसाठी गोडीगुलाबीनं दाखल करण्यात आलं. बेशुद्ध करून तिच्या संमतीविनाच तिचा गर्भपात बेकायदेशीरपणे हा गर्भपात करण्यात आला.
याबाबत सोनालीनं पोलिसांना तक्रार केली असता चार दिवस तक्रार घेण्यासाठी लावण्यात आले. कुटुंब अडून बसल्यानं तक्रार घेतली मात्र अडीच महिने उलटूनही अद्याप डॉकटर मोकळाच आहे. व्हीजीलास कमिटीनं याबाबत डॉक्टर गोरेंना दोषी मानलं असूनही पोलीस केवळ कागदावरील कारवाई करण्यात समाधान मानत होतं. मात्र आता झी मीडियानं दाखवलेल्या या बातमीनंतर डॉ. गोरे अडचणीत आले आहेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.