ग्रामीण भागातही ‘ऑनलाईन शॉपिंग’ची क्रेझ!

राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Sep 3, 2013, 03:52 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक/जळगाव
राज्यात सध्या ग्रामीण महाराष्ट्रात ऑनलाईन शॉपिगची क्रेझ वाढतेय. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुका यात अग्रेसर असून जळगाव जिल्ह्यातही क्रेझ वाढताना दिसून आलीय. ‘ई बे’ या नामांकित शॉपिंग पोर्टलने केलेल्या सर्वेक्षणात ही बाब समोर आल्यानं ग्राहक आता जागृत होत असल्याचं समोर येतंय.
नाशिकपासून २४ किलोमीटरवर असलेला हा दिंडोरी तालुका... सधन शेतकऱ्यांच्या या तालुक्यात ऑनलाइन शॉपिंग सर्वाधिक केली जात असल्याचं ई बेच्या सर्वेक्षणातून समोर आलंय. तालुक्याचा मुख्य उद्योग आहे शेती... शेकडो टन द्राक्ष या तालुक्यातून निर्यात केली जातात. प्रगतीशील शेतकरी कम्प्युटरच्या मदतीने शेती करतो. इंटरनेटचा वापर करुन हवामान, आर्द्रता याची अपडेट घेत असतो. इतकंच नाहीतर द्राक्षाचा भाव, कीटकनाशकं, संशोधनही तो ऑनलाईन करतो. शेतीसाठी लागणाऱ्या लहानमोठ्या वस्तू ऑनलाईन खरेदी करण्यात येतात. कम्प्युटरसाठी लागणारे पार्टस, आधुनिक सॉफ्टवेअरही ऑनलाईन खरेदी केली जातात. शिवाय द्राक्ष निर्यातीच्या ऑनलाईन ऑर्डरमार्फत जास्तीत जास्त नफा कमावण्याकडे इथल्या शेतकऱ्यांचा कल दिसून येतोय.
निर्यात सर्वेक्षणात हा तालुका चौथ्या तर आयातीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे तर देशांतर्गत खरेदीविक्रीत दिंडोरी तालुक्याला पाचवं स्थान मिळालंय. दिंडोरी पाठोपाठ उत्तर महाराष्ट्रातल्या जळगावचा नंबर लागतो.

कॉम्प्युटर, एन्ड्राईडमुळे आता छोटी छोटी गावं जगाशी जोडली जाऊ लागलीत. त्याचं प्रातिनिधीक उदाहरण ठरलंय दिंडोरी... महात्मा गांधीजींचे स्वप्नातील ‘ग्लोबल व्हिलेज’ची कल्पना बळीराजाने प्रत्यक्षात आणलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.