राज ठाकरे-गडकरींचे पुन्हा एकत्र, मनसे-भाजप मनोमिलन?

नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचं उद्या भूमीपूजन भाजप नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करण्याची शक्यता आहे.. या वृत्तामुळे निवडणुकीच्या तोंडावर नवी समीकरणं जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय...

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Feb 21, 2014, 01:35 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, नाशिक
नाशिकमध्ये राज ठाकरेंचं ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या गोदापार्कचं उद्या भूमीपूजन भाजप नेते नितीन गडकरी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे करण्याची शक्यता आहे.. या वृत्तामुळे निवडणुकीच्या तोंडावर नवी समीकरणं जुळणार का? असा प्रश्न उपस्थित होतोय...
राज ठाकरेंनी गेल्या नाशिक दौ-यामध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्यावर थेट हल्ला चढवला होता... त्यावरून नाराज झालेल्या भाजप नेत्यांनी मनसेसोबत संबंध तोडण्याची भूमिका घेतली होती...
त्यामुळे आजच्या या वृत्तामुळे निवडणुकांच्या तोंडावर मनसे भाजपामध्ये पुन्हा मनोमिलन होण्याची शक्यता वर्तवली जातेय...
दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे दोन दिवसांच्या नाशिक जिल्हा दौ-यावर आहेत. या दरम्यान त्यांचं ड्रीम प्रोजेक्ट गोदा पार्कचं भूमीपूजन करणार आहेत. लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीकोनातून काही बैठकाही घेण्याची शक्यताय... तर आज शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी ते जाणारेत. कालच संध्याकाळी ते नाशिकमध्ये पोहोचलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.