शिर्डी संस्थानाला कारणे दाखवा नोटीस

शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Mar 17, 2013, 02:58 PM IST

www.24taas.com,शिर्डी
शिर्डीच्या साईबाबा संस्थानाला राज्य शासनाच्या विधी आणी न्याय मंत्रालयाने कारणे दाखवा नोटीस बजावलीये. संस्थानांच्या कामात अनियमीतता असल्याचं आढळून आलीय.
राज्य सरकराची प्रत्यय़क्षात परवानगी मिळण्या आधीच लाखो रुपयांची कामं टेंडर काढून ती पूर्ण केल्याची माहिती सामाजीक कार्यकर्ते संजय काळे यांनी माहीतीच्या अधिकारातून मिळवलीये. त्यामुळे संस्थानाला ही नोटीस बजावण्यात आलीये. साईसंस्थानचा कारभार चांगला चालण्यासाठी नेमलेल्या विश्वस्तांनीच गैरकारभार केल्याचं उघड झालंय.

मात्र साईसंस्थानवर शासनानेच प्रतीनियुक्त केलेल्या उप-जिल्हाधिकारी दर्जाच्या अधिका-यांनी कामात हलगर्जी केल्याचं उघड झालंय. विशेष म्हणजे शिर्डी संस्थानाला नोटीस बजावणा-या विधी आणि न्याय विभागाने कार्यकारी अधिकारी आणि उप-कार्यकारी अधिकारी पदावर दोनदा मुदवाढ दिली असल्याने साई संस्थानच्या कारभारा बरोबर राज्य शासनाच्या कारभारावरही प्रश्न उपस्थीत होत आहेत.