दहशतवादी कसाबला पुण्यात फाशी

मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Nov 21, 2012, 01:07 PM IST

www.24taas.com,पुणे
मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यातील दोषी पाकिस्तानचा क्रुरकर्मा अजमल कसाब याला आज बुधवारी सकाळी साडेसात वाजता पुण्यातील येरवडा कारागृहात फाशी देण्यात आल्याची माहिती, राज्याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी दिली.
मुंबईवरील २६ नोव्हेंबर २००८ मध्ये दहशतवादी करण्यात आला होता. कसाबने दयेचा अर्ज केला होता. मात्र, राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कसाबचा दयेचा अर्ज मंगळवारी फेटाळल्याचे वृत्त आज प्रसिद्ध झाले. त्यामुळे कसाबला कधी फाशी देणार आणि कुठे फाशी देण्यात येणार असे प्रश्न उपस्थित होत होते. पण, काही वेळातच गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कसाबला येरवडा कारागृहात सकाळी साडेसात वाजता फाशी देण्यात आल्याची माहिती दिली.
डॉक्टरांनी कसाबला मृत घोषित करण्यात आले. कसाबला फासावर लटविण्यात आल्यानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून येरवडा कारागृहाबाहेर पोलिस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. आर्थर रोड ते येरवडा कारागृह असे कसाबचा प्रवास सरकारकडून अत्यंत गोपनीय ठेवण्यात आला होता.
मुंबईवरील या हल्ल्याला चार वर्षांचा कालावधी या २६ नोव्हेंबरला पूर्ण होणार होते. त्यापूर्वीच कसाबला फासावर लटविण्यात आले आहे.