शिवकालीन गढी पुन्हा करणार इतिहास जागा!

पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे. निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं..... ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे.

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jun 24, 2013, 09:47 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, पिंपरी-चिंचवड
पिंपरी चिंचवडमध्ये शिवकालीन इतिहास पुन्हा जागा होणार आहे. निमित्त आहे एका गढीच्या जीर्णोद्धाराचं..... ही गढी पुन्हा इतिहासाची साक्ष देत दिमाखात उभी राहणार आहे.
पुण्याच्या इतिहासाची साक्ष देणारी ही पिंपरी-चिंचवडमधली गढी..... ही गढी सतराशे बावीसमध्ये म्हणजेच शनिवारवाड्यापूर्वी बांधल्याची नोंद आहे. गढीमध्ये असलेली भुयारं, प्रवेश द्वाराला असलेली दोन सदरे, मजबूत दरवाजा आणि २९१ वर्षांपूर्वीचं मजबूत बांधकाम यामुळे आजही ही गढी आकर्षण ठरते. विशेष म्हणजे या गढीतलं भुयारं थेट चाकणच्या किल्यापाशी आणि इंद्रायणी नदीजवळ निघतात. हे वैभव जतन करण्यासाठी आता या गढीचा जीर्णोद्धार होणार आहे.
या गढीमध्ये भव्य कलादालन आणि शिवकालीन वास्तूसंग्रहालयही उभारण्यात येणार आहे. पिंपरी चिंचवडमध्ये इतिहासाची साक्ष देणारी ही एकमेव वास्तू आहे. तिचं जतन होणार असल्यानं इतिहासाच्या आठवणी पुन्हा जाग्या होतील आणि पुढच्या पिढीपर्यंत वैभवाचा वारसाही पोहोचेल.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.