लोणावळ्यातील स्टंट विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतला

अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Aug 28, 2013, 01:12 PM IST

www.24taas.com , झी मीडिया, पुणे
अती उत्साहाच्या भरात केलेलं साहस इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतले आहे. ही घटना लोणावळ्यात घडलेय. त्यांने दोन पुलावरून उडी मारण्याचा प्रयत्न केला आणि तो फसला.
लोणावळा येथे पुणे मुंबई एक्स्प्रेस हायवेवरच्या अमृतांजन पुलावरून शेजारील जुन्या पुलावर उडी मारण्याच्या प्रयत्नामध्येन दोन पुलांच्या मधल्या जागेतून थेट खाली एक्स्प्रेस हायवेवर पडल्यानं तो गंभीर जखमी झाला. यामध्ये त्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला.
प्रवीण महाडीक असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. प्रवीण पुण्यातील शिक्रापूर इथल्या इन्स्टिट़यूट ऑफ नॉलेज ऑफ इंजिनिअरींग या संस्थेत तिस-या वर्षामध्ये शिकत होता. प्रवीण आपल्या चार मित्र-मैत्रिणींसह लोणावळ्यामध्ये फिरावयास आले होते.
अमृतांजन पॉईंट इथं संध्याकाळच्या वेळी सनसेटचे फोटो काढत असताना अचानक प्रवीणनं एका पुलावरून दुस-या पुलावर उडी मारण्याचं धाडस केलं. मात्र आणि त्यातच तो आपला जिव गामावून बसला. मागील वर्षी याच ठिकाणी अशाच प्रकारे एका कॉलेज युवकाचा म्रुत्यू झाला होता.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.
पाहा व्हिडिओ