अरमान कोहलीला जामीन मंजूर... गेला बिग बॉसच्या घरात...

बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Dec 18, 2013, 07:43 AM IST

www.24taas.com, झी मीडिया, नवी दिल्ली
बिग बॉसच्या घरातून डायरेक्ट तुरुंगात गेलल्या बॉलिवूड अभिनेता अरमान कोहली याला जामीन मंजूर करण्यात आलाय. सोमवारी रात्री उशीरा अरमानला बिग बॉसच्या घरातून अटक करण्यात आली होती. सध्या मिळत आलेल्या माहितीनुसार अरमान पुन्हा बिग बॉसच्या घरात दाखल झाला आहे.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला सेलच्या काही कार्यकर्त्यांनी अरमान कोहली विरोधात बिग बॉसच्या घराबाहेर घोषणाबाजी केली. तसेच त्याची गाडी अडवण्याचाही प्रयत्न केला.
ब्रिटिश गायिका – अभिनेत्री सोफिया हयात हिनं शो दरम्यान अरमाननं तिच्यावर कथित स्वरुपात हल्ला करण्याची तक्रार पोलिसांमध्य दाखल केली होती. यानंतर, काल लोणावळा पोलीसांनी रात्री सुमारे ११ वाजल्याच्या दरम्यान अटक केली. पोलीस स्टेशनमध्ये त्याची चौकशी केली गेली.

सोफिया हयात हिनं ११ डिसेंबर रोजी अरमानबरोबर झालेल्या भांडणाची मुंबईमधल्या सांताक्रुज पोलीस स्टेशनमध्ये लेखी तक्रार नोंदवली होती. या तक्रारीत तिनं अरमानवर मारामारी, शिविगाळ आणि बेसीस्तपणाचा गुन्हा नोंदविला आहे. बिग बॉसचा स्टुडियो लोणावळ्यात असल्यामुळे सांताक्रुज पोलिसांनी ही तक्रार लोणावळा पोलीस स्टेशनला ट्रान्सफर केली होती. सोफियानं सांगितल्याप्रमाणं ही घटना ४ डिसेंबरला घडली. त्या शोचा काही हिस्सा हा बिग बॉसच्या शोमध्ये दाखवण्यात आला होता. परंतु काही भाग प्रसारीत करण्यात आला नव्हता.
बिग बॉस शो दरम्यान अरमान आणि सोफिया यांच्यात चांगलाच वाद झाला होता... आणि राग येऊन अरमाननं सोफियावर ‘मॉप’ फेकून मारला. यामुळे सोफिया दुखावली होती.
विरोधी, औलाद के दुष्मन आणि जानी दुष्मन : एक अनोखी कहानी या सिनेमांत काम केलेला अभिनेता अरमान ‘बीग बॉस सीझन ७’ मध्ये बऱ्याचदा आपल्या रागामुळे चर्चेत आलाय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.