कधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स!

आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-

Updated: May 18, 2015, 04:53 PM IST
कधीच तुटणार नाहीत क्रिकेटचे हे १० रेकॉर्ड्स! title=

मुंबई: आकड्यांचा खेळ असलेल्या क्रिकेटमध्ये रेकॉर्ड्स बनतात आणि तुटतात. मात्र असे काही रेकॉर्ड्स आहेत, जे तुटणं कठीण नाही जवळपास अशक्यच आहे. पाहा कोणते हे १० रेकॉर्ड्स-

१. डॉन ब्रॅडमॅन: टेस्टमध्ये ९९.९४च्या सरासरीनं बॅटिंग
६७ वर्षांपूर्वी डॉन ब्रॅडमॅन टेस्ट क्रिकेटमधून निवृत्त झाले होते. मात्र टेस्ट क्रिकेटमध्ये बॅटिंग सरासरीचा त्यांचा रेकॉर्ड आजही कायम आहे. तो कुणीच तोडू शकलं नाही. कदाचित पुढेही तो तोडला जाणार नाही. ब्रॅडमॅन यांनी ९९.९४ सरासरीनं रन्स बनवले. त्यांच्या नंतर चांगल्या सरासरीनं टेस्टमध्ये रन्स बनवणारा दुसरा बॅट्समन आहे दक्षिण आफ्रिकेचे ग्रीम पोलाक यांनी... पोलाकच्या बॅटिंग सरासरी आहे ६०.९७

२. सचिन तेंडुलकर: वनडे क्रिकेटमध्ये १८,४२६ रन्स

सचिनचा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स १८,४२६ बनविण्याचा रेकॉर्ड तोडणं सध्यातरी अशक्य वाटतंय. या लिस्टमध्ये सचिनच्या खालोखाल जो क्रिकेटपटू होता त्यानं वनडे क्रिकेटमधून निवृत्ती घेतलीय.

३. मुथय्या मुरलीधरन: १३४७ बॅट्समनचा बळी

इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये केवळ दोन बॉलर्स आहेत ज्यांनी १००० विकेट घेण्याचा आकडा पार केलाय. पहिले मुथय्या मुरलीधरन आणि दुसरा शेन वॉर्न. मुरलीनं १३४७ विकेट घेतल्यात. तर वॉर्नने १००१ चा टप्पा गाठला. मुरलीचा रेकॉर्ड तोडणं तर सोडा कोणताही बॉलर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १००० विकेट घेण्याबद्दलचा विचारही करत नाही. 

४. जॅक होब्स: फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ६१,७६० रन्स

इंग्लंडचे सर जॅक होब्स यांनी फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये बॅटिंगचा जो क्लास दाखवला. आज पण क्रिकेटमध्ये त्याच्या जवळपासही कोणी फिरकू शकला नाहीय. आपल्याला आश्चर्य वाटेल पण सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, सुनील गावस्कर, रिकी पॉटिंग आणि ब्रायन लारा सारखे क्रिकेटपटू फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये सर्वाधिक रन्स बनवणाऱ्या टॉप १० बॅट्समनच्या यादीत पण नाहीय.

५. जिम लेकर: एका टेस्टमध्ये १९ विकेट्स

इंग्लंडचे जिम लेकर यांनी १९५६मध्ये इंग्लंडच्या विरुद्ध एका टेस्टमध्ये १९ विकेट घेण्याचा जो रेकॉर्ड बनवला होता. त्याला इतक्या वर्षांमध्ये तोडणं तर दूर कुणी रेकॉर्डची बरोबरी सुद्धा करू शकलं नाहीय. ज्याला हा रेकॉर्ड तोडायचा असेल त्याला टेस्ट मॅचच्या दोन्ही इनिंगमध्ये सर्व २० विकेट्स घ्यावा लागतील.

६. ग्राहम गूच: एका टेस्टमध्ये ४५६ रन्स

ग्राहम गूच यांनी हा रेकॉर्ड टीम इंडियाविरुद्ध १९९०मध्ये बनवला होता. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये ३३३ आणि दुसऱ्या इनिंगमध्ये १२३ रन्स बनवले होते. त्यानंतर ब्रायन लारा यांनी एका इनिंगमध्ये ४०० रन्स बनवण्याचा रेकॉर्ड बनवला होता. मात्र गूच यांचा हा रेकॉर्ड अजून कुणीही तोडू शकलं नाही.

७. विल्फ्रेड रोड्स: फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४२०४ विकेट्स

आपल्याला ऐकून आश्चर्य वाटेल की इंग्लंडच्या या दिग्गज क्रिकेटपटूनं १११० फर्स्ट क्लास मॅच खेळल्या आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये ४ हजार विकेट्सचा टप्पा ओलांडणारे जगातील एकमेव क्रिकेटपटू बनले. मागील ३० वर्षांमध्ये कोणताही बॉलर टॉप २५ फर्स्ट क्लास बॉलर्सच्या यादीत जागा बनवू शकला नाही. रेकॉर्ड तोडणं तर दूरची बाब आहे. 

८. चामिंडा वास: वनडे मॅचमध्ये ८ विकेट

श्रीलंकाचा खब्बू बॉलर चामिंडा वासनं २००१मध्ये केवळ १९ रन्स देऊन ८ विकेट्स घेतल्या होत्या. आजपर्यंत त्यांच्या या रेकॉर्डची कुणी बरोबरीही करू शकलं नाही.

९. ख्रिस गेल: ३० बॉल्समध्ये सेंच्युरी

ख्रिस गेलनं दोन वर्षांपूर्वी आयपीएलमध्ये केवळ ३० बॉल्समध्ये सेंच्युरी लगावली होती. टी-२० मधील ही सर्वात फास्ट सेंच्युरी होती. गेलचा रेकॉर्ड तोडण्यासाठी प्रत्येक बॉलवर तीन रनहून अधिक सरासरी हवी. अशात हा रेकॉर्ड तोडणं खूप कठीण आहे. 

१०. फिल सिमंस: १० ओव्हरमध्ये ३ रन

वनडे क्रिकेटमध्ये ०.३ची इकॉनॉमी. वाचून घाबरू नका. मात्र वेस्ट इंडिजच्या फिल सिमंसने २३ वर्षांपूर्वी पाकिस्तान विरुद्ध हा कारनामा केला होता. सिमंसनं सिडनीमध्ये खेळल्या गेलेल्या वनडे मॅचमध्ये १० ओव्हरमध्ये ८ मेडन ओव्हर देत केवळ ३ रन्स दिले होते आणि चार विकेट्स घेतल्या होत्या. 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.