मॅच हारण्यासाठी 2 लाख डॉलरची ऑफर - जोकोविच

खेळ विश्वात फिक्सिंग आता मोठ्या प्रमाणात बळावला आहे. सर्वच क्षेत्रामध्ये फिक्सिंग होण्याचं प्रमाण वाढले आहे. आयपीएलमध्ये तर आता बेटींगही कायदेशीर करण्याची चर्चा केली जात आहे. अशाच वेळेत टेनिस ही फिक्सिंगपासून वाचू शकलेलं नाही.

Updated: Jan 18, 2016, 07:58 PM IST
मॅच हारण्यासाठी 2 लाख डॉलरची ऑफर - जोकोविच title=

मेलबर्न : खेळ विश्वात फिक्सिंग आता मोठ्या प्रमाणात बळावला आहे. सर्वच क्षेत्रामध्ये फिक्सिंग होण्याचं प्रमाण वाढले आहे. आयपीएलमध्ये तर आता बेटींगही कायदेशीर करण्याची चर्चा केली जात आहे. अशाच वेळेत टेनिस ही फिक्सिंगपासून वाचू शकलेलं नाही.

टेनिसमध्ये सध्याचा नंबर १ खेळाडू याला सामना हारण्यासाठी तब्बल २ लाख डॉलरची ऑफर असल्याचं त्याने म्हटलं आहे. त्यामुळे टेनिसमध्येही आता फिक्सिंग होत असल्याच्या बातमीला दुजोरा मिळाला आहे.

बीबीसी आणि बझफिडने मागील दशकात ग्रँण्डस्लॅम विजेत्यांसह १६ टेनिसपटूंवर फिक्सिंगमध्ये सहभागी असल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर जोकोविच हा खुलासा केल्याने टेनिस क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. 

पत्रकारांशी बोलतांना जोकोविच म्हणाला की 'फिक्सिंग हा खेळ क्षेत्रातील मोठा गुन्हा आहे. कोणत्याही खेळात याला थारा देऊ नये.'