पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार

मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. 

Updated: Apr 7, 2016, 12:37 PM IST
पोरबंदरचा अजय लालचेता 'ओमान'च्या क्रिकेट संघाचा कर्णधार title=

मुंबई : मूळचा पोरबंदरचा असणारा, पण सध्या ओमानमध्ये राहणारा अजय लालचेता ओमानच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघाचा कर्णधार झाला आहे. भारतासाठी आणि पोरबंदरवासियांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

३२ वर्ष वय असणारा अजय लेफ्ट आर्म बॉलर आहे. टी-२० विश्वचषकाच्या पात्रता फेरीत त्याने आयर्लंडविरुद्ध चांगली कामगिरी केली होती. त्यामुळेच त्याच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला होता.

यापूर्वी तो 'सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन'च्या माध्यमातून अंडर १४ आणि अंडर १९ क्रिकेटही खेळला आहे. २००६ साली नोकरीनिमित्ताने तो ओमानला स्थायिक झाला. तिथे तो काम करत असलेल्या कंपनीच्या क्रिकेट संघातून खेळायला त्याने सुरुवात केली.

अजयचे कुटुंबीय आजही पोरबंदरमध्ये राहतात. ओमानच्या टी-२० संघाचा कर्णधार होणे, हा त्यांच्यासाठीही आनंदाचा धक्का आहे. अजयला मात्र इथेच थांबायचं नसून २०१९ मध्ये होणाऱ्या एकदिवसीय क्रिकेट विश्वचषकात त्याच्या संघाला स्थान मिळवून देण्याची इच्छा आहे.